भीषण अपघात: टिप्पर आणि मध्यप्रदेश परिवहन बसमध्ये आमने-सामने धडक – ३ ठार, १ गंभीर, १७ जखमी

मराठी न्यूज माझा
0

भीषण अपघात: टिप्पर आणि मध्यप्रदेश परिवहन बसमध्ये आमने-सामने धडक – ३ ठार, १ गंभीर, १७ जखमी

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – खामगाव-नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात तीन मजूर जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी असून १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास आमसरी जवळील हॉटेल रुद्राजवळ मध्यप्रदेश परिवहनाची बस आणि विटांनी भरलेली टिप्पर यांच्यात भीषण धडक झाली. विटांच्या टिप्परने बसला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने अपघातात मोठी हानी झाली आहे.

अपघातस्थळी भीषण दृश्य

अपघातस्थळी टिपर आणि बसची स्थिती जखमी प्रवाशांना बाहेर काढताना जखमी रस्त्यावर पडलेले

या अपघातात तीन मजूर जागीच ठार झाले असून ते निमगाव येथील वीटभट्टीवर काम करणारे कोरकू समाजातील होते. अपघातात एक गंभीर जखमी असून त्याच्यावर खामगावच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी प्रवाशांची नावे:

  • शंकर जानू जटाले (म.प्र. – बस चालक)
  • ज्ञानेश्वरी प्रल्हाद कळंब (४०, अकोला)
  • बिरज धजय सेवादास (४०, अकोला)
  • ज्योती धीरज धनंजय (३०, अकोला)
  • वशीम शेख बशीर (३२, ब्राहनपूर – म.प्र.)
  • बबीता संतोष भोजने (३०, खामगाव)
  • विमला सुरेश मित्रा (५४, वार्ड क्र. ३, खामगाव)
  • समाधान श्रीकृष्ण बोरे (२७, अडोळे)
  • श्यामलाल बाबुलाल कजगर (३५, कवळजीरी – अमरावती)
  • उषा नामदेव यादव (४४, अकोला)
  • ऐश्वर्या प्रकाश चव्हाण (२०, अकोला)
  • वैष्णवी रमेश अवचार (२०, अकोला)
  • गजानन नामदेव यादव (४५, अकोला)
  • शैलजा रवींद्र शिंदे (४५, खामगाव)
  • समृद्धी रवींद्र शिंदे (१२, खामगाव)
  • ज्योती संजय गोसावी (३५, नेर)
  • एक अज्ञात इसम

रुग्णालयातील दृश्ये:

रुग्णालयात उपचार घेत असलेले जखमी खामगाव शासकीय रुग्णालयातील दृश्य

घटनास्थळी गर्दी आणि तपास

घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी

– मराठी न्यूज माझा

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)