भुसावळ रेल्वे विभागात 'स्वच्छता ही सेवा 2025' या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान राबविण्यात येणार आहे. या वर्षीच्या अभियानाची थीम ‘स्वच्छोत्सव’ अशी ठेवण्यात आली आहे. दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी शेगाव रेल्वे स्थानकावर विशेष कार्यक्रमाने सुरू करण्यात आली. रो्टरी क्लबच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध विभागांचे कर्मचारी, स्थानक स्वच्छता कर्मचारी व मान्यवरांनी सहभाग घेतला. प्रवाशांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी उद्घोषणा प्रणाली व सोशल मीडिया चा वापर करून विविध संदेशांचे प्रसारण केले जात आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेऊन केली. यानंतर "श्रमेदान" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. एक तासाच्या या श्रमेदानामध्ये सर्व उपस्थितांनी स्थानक परिसर, प्लॅटफॉर्म व आजूबाजूच्या भागाची सफाई केली.
रेल्वे प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपण सर्वांनी मिळून सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा आणि ‘स्वच्छ भारत’ घडवण्यासाठी आपले योगदान द्यावे.