जळगांव (जामोद) व संग्रामपुर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळ जळगांव जा .यांच्या वतीने उपवर युवक युवती परिचय संमेलन संदर्भात रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र जळगांव (जामोद) येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत परिचय संमेलन रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सातपुडा कॅम्पस जळगांव जामोद येथे घेण्याचे ठरविले.
मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले मंडळ जळगांव (जामोद) यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असते.
मंडळाच्या या वर्षीच्या विविध कार्यक्रमासाठी सर्वानुमते
अध्यक्ष:- शांताराम म्हसाळ (वकाना),
कार्याध्यक्ष:-शंकरराव करांगळे (जळगांव)
सचिव:- राजेश वानखडे(जळगांव ),
उपाध्यक्ष:-सुरेश जाधव (वडगांव पाटण) संतोष देऊकार (वानखेड) कोषाध्यक्ष:-वैभव गायकी (संग्रामपुर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपवर युवक युवती परिचय सम्मेलन नोंदणीची अंतिम तारीख दि. १० डिसेंबर २०२५ ठरविण्यात आली. सदर बैठकीला
प्रा.हरिभाऊ इंगळे, डॉ.एस.एन.भोपळे,
,, नितीनभाऊ सातव, डाँ संदीप वाकेकर, प्रविणभाऊ भोपळे
शालिग्राम भोपळे, ,मारोती वानखडे ,पांडुरंग भोपळे राजीव घुटे, अँड संदीप मानकर ,ज्ञानदेव राजनकर,
मधुकर वानखडे, सुधाकर जाधव, संदीप शिरेकार, डाँ राखोंडे,अंबादास उगले,विजय म्हसाळ, प्रभुदास बंबटकर, रतन इंगळे, निलकंठ उमाळे, कैलास घुटे ,गुलाबरावभाऊ इंगळे, जयदेवराव वानखडे,राजकुमार भड,आकाश उमाळे, कार्तिक राऊत, गणेश भड,
रामकृष्ण खिरोडकर,अनिल इंगळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
प्रस्ताविक नितीनभाऊ सातव यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदकिशोर निमकर्डे यांनी केले.