विनोद खंडारे,बुलडाणा
जळगांव (जामोद) आणि संग्रामपूर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळ यांच्या वतीने आयोजित ३७ वे उपवर युवक-युवती परिचय संमेलन रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या संमेलनाचे आयोजन सातपुडा कॅम्पस, जळगांव जामोद येथे करण्यात आले आहे.
माजी आमदार कृष्णरावजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, १४ सप्टेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र, जळगांव (जामोद) येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महात्मा फुले मंडळाच्या या वर्षीच्या कार्यक्रमांसाठी नवीन कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी शांताराम म्हसाळ, कार्याध्यक्षपदी शंकरराव करांगळे, सचिवपदी राजेश वानखडे, उपाध्यक्षपदी सुरेश जाधव व संतोष देऊकार आणि कोषाध्यक्षपदी वैभव गायकी यांची निवड झाली.
या परिचय संमेलनासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. बैठकीला प्रा. हरिभाऊ इंगळे, डॉ. एस.एन. भोपळे, नितीन सातव, डॉ. संदीप वाकेकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक नितीन सातव यांनी केले, तर नंदकिशोर निमकर्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.