क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त खामगावात भव्य दुचाकी रॅली; ना.आकाश फुंडकर यांनी केले अभिवादन

मराठी न्यूज माझा
0

खामगाव (प्रतिनिधी) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. राज्यमंत्री ना. आकाश फुंडकर यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन माळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. सकाळी सर्वप्रथम स्थानीय जे.एच. मेहता हायस्कूल परिसरात महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यानंतर शहरभर भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. रेल्वे स्टेशन चौक, टॉवर चौक, छत्रपती शिवाजी नगर, आठवडी बाजार, जगदंबा चौक, टिळक पुतळा, जलंब नाका, नांदुरा रोड आदी प्रमुख मार्गांवरून रॅलीने फेरफटका मारला. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

माळी समाज भवन येथे रॅलीचा समारोप झाला. या ठिकाणी रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. रॅली मार्गावर विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांकडून ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले तसेच जलपानाची व्यवस्था करण्यात आली होती.

या कार्यक्रमात स्थानिक समाजबांधव, युवा कार्यकर्ते, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सामाजिक एकतेचा आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर घडवणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)