संतोष जुनगडे (नांदुरा) ,ता. ११ एप्रिल –
नांदुरा नगरपरिषद कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला कार्यालय अधीक्षक व कर अधीक्षक गणेशराव मुळे, नगर अभियंता एम. आर. फारुकी, रमय योजनेचे सिद्धार्थ वानखडे, पाणीपुरवठा विभागाचे मोहन राठोड, कर विभागाचे नितीन खंडारे व निलेश सोनवणे, जन्म-मृत्यू विभागाचे अक्षय जाधव हे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात नांदुरा शहरातील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुरेशदादा पेठकर, तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते व सामाजिक कार्यकर्ते राजेश वानखडे यांनीही सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन नगरपरिषद कर्मचारी गजानन वानखडे यांनी केले. महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.