![]() |
मंगलाताई गर्दे |
अखिल भारतीय ग्राहक उन्नती संघटनेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी मंगलाताई गर्दे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण साधण्यासाठी कार्यरत असलेल्या या संघटनेत मंगलाताई गर्दे आता महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
त्यांची ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर शुक्ला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. भारत सावळे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब पांडे आणि महासचिव ॲड. संतोष भगत यांच्या हस्ते करण्यात आली. ही नियुक्ती 01 जून 2025 ते 01 जून 2027 या कालावधीसाठी वैध राहणार आहे.
मंगलाताई गर्दे या यापूर्वीही सामाजिक कार्यात सक्रीय राहिल्या असून, ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठी आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवत आल्या आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
नियुक्तीनंतर मंगलाताई गर्दे यांनी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून, ग्राहक हितासाठी निष्ठेने आणि समर्पित भावनेने कार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या नेतृत्वामुळे बुलढाणा जिल्ह्यात ग्राहक चळवळीला नवी दिशा व ऊर्जा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.