संतोष जुनगडे यांची न.प कार्यालयातील दिव्यांग कार्यालयाच्या स्थलांतरासाठी मागणी

मराठी न्यूज माझा
0

संतोष यशवंत जुनगडे
नागेश तांदळे,नांदुरा

नगरपरिषद कार्यालयातील दिव्यांग (अपंग) नागरिकांसाठी असलेले कार्यालय सध्या वरच्या मजल्यावर आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हे कार्यालय खालच्या मजल्यावर स्थलांतरित करण्याची मागणी श्रमजीवी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष यशवंत जुनगडे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिव्यांग नागरिकांना वरच्या मजल्यावर जाणे कठीण असल्याने त्यांना  ये जा  करताना अडचणी निर्माण होतात. त्यांची सोय लक्षात घेऊन हे कार्यालय खालच्या मजल्यावर स्थलांतरित करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आवश्यक सेवा मिळू शकतील.  

नगरपरिषद प्रशासनाने या मागणीची सकारात्मक दखल घ्यावी आणि लवकरात लवकर योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)