नांदुरा येथे जिजाऊ रथयात्रेच्या स्वागतासाठी नियोजन सभा संपन्न

मराठी न्यूज माझा
0

नागेश तांदळे,नांदुरा 

 मराठा सेवा संघाच्या मराठा जोडो अभियानांतर्गत जिजाऊ रथयात्रा २०२५ चे आगमन दि. २० एप्रिल रोजी मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात होणार आहे. या रथयात्रेच्या भव्य स्वागतासाठी नांदुरा येथे दि. २ एप्रिल रोजी विश्रामगृहात नियोजन सभा आयोजित करण्यात आली.

     या सभेच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ रथयात्रेचे नांदुरा तालुका समन्वयक सुभाषभाऊ पेठकर होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुभाषराव कोल्हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत डॉ. मनोहर तुपकर (राज्य सहसचिव, मराठा सेवा संघ), इंजि. रविकांत काजळवाघे, रविंद्र चेके, योगेश पाटील (प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड), कैलासराव तायडे (विभागीय संघटक), इंजि. सचिन तायडे (जिल्हा सचिव, मराठा सेवा संघ), शिवमती सिमाताई ठाकरे (जिल्हाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड), बाळासाहेब पाटील (अखिल भारतीय मराठा महासंघ), ह. भ. प. रामभाऊ महाराज झांबरे, अमर पाटील (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), संतोषराव मुंडे पाटील आणि छोटू पाटील (मा. जिल्हाध्यक्ष, मराठा पाटील युवक समिती) यांचा समावेश होता.

प्रास्ताविकात सुभाषराव कोल्हे यांनी मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित जिजाऊ रथयात्रेचे महत्त्व, उद्दिष्टे आणि नियोजन यावर प्रकाश टाकला. त्यांनी नांदुरा नगरीतून या यात्रेच्या मार्गक्रमणाची दिशा आणि कोपऱ्यावरील सभांचे स्थळ निश्चित करण्यात आले असल्याची माहिती दिली.

तालुका समन्वयक सुभाषभाऊ पेठकर यांनी नियोजनासाठी विविध समित्यांचे गठण केले. त्यामध्ये –

- प्रचार प्रसार समिति : अमर पाटील, प्रफुल्ल बिचारे, राहुल घाटे

- बाईक रॅली समिति : अमर पाटील, दिलीप कोल्हे, ज्ञानेश्वर डामरे, सुनील जुनारे, डॉ. शरद पाटील, विष्णु बाठे, कविता देशमुख, गणेश काटे, छोटू पाटील

- स्वागत सत्कार समिति : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा पाटील युवक समिती, सायकल रॅली ग्रुप, सावित्री-जिजाऊ विचार मंच पदाधिकारी

- डिजिटल बॅनर फ्लेक्स समिति : प्रमोद हिवाळे, राहुल घाटे

- जनजागृती प्रचार रथ समिति : दीपक ढोले

- लेझीम, ढोलपथक, वारकरी दिंडी समिति : ह. भ. प. रामभाऊ महाराज झांबरे, सुनील जुनारे, संतोष डिवरे

प्रमुख व्यक्ती निमंत्रण समिति : अशोकभाऊ धनोकार, भगवान सोयस्कर सर, शिवशंकर शिंबरे सर

सभेला निश्चल इंगळे, संगीता वाघ, रेखा ताई वाळेकर, शैला शिंगणे, सुनयना अढाव, अक्षय जुनारे, विवेक बाठे, विनोद वनारे, राजू हांडे पाटील, प्रथमेश जुनारे, सतिश लांजुळकर, ज्ञानेश्वर मनस्कार, निलेश देशमुख, मुरलीधर काटे, कुलदीप डंबेलकर, अभिनव पाटील, योगेश्वर पेठकर, अतुल गव्हाड, संजू पाटील, गजानन बुळे, प्रतिक देशमुख, विजय ढोके, ज्ञानेश्वर चोपडे, उद्धव गावंडे, पी. बी. अढाव, अभिषेक पाटील, रुपेश मुकुंद, भगिरथ मनस्कार, रामेश्वर जुनारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.सभेचे संचालन शिवशंकर शिंबरे सर (मराठा सेवा संघ) यांनी केले तर आभार प्रदर्शन भगवान सोयस्कर (ता. अध्यक्ष, मराठा सेवा संघ) यांनी केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)