भरधाव स्पोर्ट्सबाईक झाडावर धडकून तिघांचा मृत्यू

मराठी न्यूज माझा
0

चिखली-

जाफराबाद महामार्गावर भोकरवाडीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या स्पोर्ट्सबाईकचा ताबा सुटल्याने दुचाकी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात रोहित चाबुकस्वार, शुभम चाबुकस्वार आणि सोनू उसरे या तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.  

चिखली-जाफराबाद मार्गावर तिघे मित्र एकाच स्पोर्ट्सबाईकवरून वेगात जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी झाडावर धडकली. अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली होती आणि तिघांचे मृतदेह झाडाजवळ विखुरलेले आढळले. अपघातात डोक्याला गंभीर मार बसल्याने तिघेही जागीच ठार झाले.  

विशेष म्हणजे, तिघांपैकी कोणीही हेल्मेट घातले नव्हते, त्यामुळे डोक्याला जबर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह चिखली येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. तिघेही सिल्लोड तालुक्यातील पिंपरी (जि. संभाजीनगर) येथील रहिवासी असल्याचे समजते.  

या घटनेमुळे चाबुकस्वार आणि उसरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आणि नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)