नांदेड : जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर यांच्या वतीने रमेश कसबे यांना यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. बोल बाबासाहेबांचे या पुस्तकाचे लेखक असलेल्या रमेश कसबे यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे आणि सरचिटणीस डॉ. प्रकाश करमाडकर यांच्या स्वाक्षरीने निवडीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले.
हा पुरस्कार दि. 30 मार्च 2025 रोजी नागपूर येथे प्रदान करण्यात येणार आहे. रमेश कसबे यांनी वाढती लोकसंख्या, कुपोषण, पर्यावरण, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि महिलाविषयक विषयांवर विविध नामांकित वर्तमानपत्रांमधून लेखन केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे.
रमेश कसबे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.