उमाताई बोचरे यांची महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्रीपदी नियुक्ती

मराठी न्यूज माझा
0

 उमाताई बोचरे 
नवी दिल्ली,

राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ, नवी दिल्लीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अब्दुल रहीम यांच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय प्रभारी चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उमाताई बोचरे यांची महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीनंतर संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.  

गोरगरिबांचे कैवारीपण आणि तडफदार पत्रकारितेचा गौरव  

उमाताई बोचरे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात तडफदार लेखणीने अनेक भ्रष्टाचाराचे बिंग फोडले आहे. गोरगरीब, पीडित आणि अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी शासन आणि प्रशासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

समाजसेवेत उल्लेखनीय योगदान  

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या छोट्या गावातून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केलेल्या उमाताई बोचरे यांनी केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित न राहता समाजसेवेचेही मोलाचे कार्य केले आहे. गावातील गरीब व असहाय्य लोकांच्या अडचणी सोडविणे, शासकीय आणि अशासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, तरुणांना बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यास मार्गदर्शन करणे, संजय गांधी निराधार योजना, अपंगांसाठी शासकीय लाभ मिळवून देणे आणि कौटुंबिक वाद मिटवून अनेक संसार तुटण्यापासून वाचविणे, या सर्व क्षेत्रांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना समाजसेविका म्हणूनही मोठा लौकिक मिळाला आहे.  

नियुक्तीनंतर परिसरात उत्साहाचे वातावरण  

उमाताई बोचरे यांच्या नियुक्तीची वार्ता परिसरात पसरताच सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दूरध्वनीवरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.  

मराठी न्यूज माझा चॅनेल समूहाकडून उमाताई बोचरे यांना हार्दिक शुभेच्छा !!

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)