नांदुरा (प्रतिनिधी) – नगर परिषद मराठी कन्या शाळा, नांदुरा येथे कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त गोपाल काला कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या मंगलपूजनाने व गीतेच्या पठणाने झाली. लहानग्या विद्यार्थिनींनी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत आकर्षक नृत्य, गाणी व बाललीला सादर करून उपस्थितांची मनं जिंकली.
यानंतर गोपाल कालाचा कार्यक्रम रंगला. दही, दूध, लोणी, फळे, भाजीपाला, धान्य यांचा समावेश करून विद्यार्थिनींनी सामूहिक काला तयार केला. "एकीचे बळ, भक्तीची ओळ" या भावनेतून तयार झालेला प्रसाद सर्वांना वाटण्यात आला.या प्रसंगी शिक्षकांनी श्रीकृष्णाच्या बाललीला, गीतेतील संदेश व भक्तीमूल्यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. गजानन वानखडे यांचे मार्गदर्शन लाभले तर वर्गशिक्षिका सौ. वेरुळकर, सौ. धरमकर, कु. राणे, कु. तेलरकर व कु. ताकवाले यांचे विशेष योगदान राहिले.अशा उपक्रमातून विद्यार्थिनींच्या मनात भक्ती, परंपरा, एकी व सामूहिकतेची भावना दृढ करण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.