भारत सरकारच्या विधी न्याय आणि कंपनी मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून मान्यता प्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन ग्राहक संरक्षण यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक नागपूर येथील नागभवन शासकीय इमारतीत दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी पार पडली.
या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर शुक्ल, राष्ट्रीय सचिव बाळासाहेब पांडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा डॉ विनोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणी, ग्राहक संरक्षणाचे धोरण आणि संघटनेचे उद्दिष्ट यावर या बैठकीत सखोल चर्चा झाली.
राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर शुक्ल यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना ग्राहक संरक्षणविषयी सखोल माहिती दिली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत ग्राहक हक्कांचे संरक्षण पोहोचवणे, ग्राहकांची होणारी लूट थांबवणे आणि संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणे हे संघटनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा डॉ विनोद गायकवाड यांनी सांगितले.
या वेळी महाराष्ट्रातील काही निवडक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची थेट राज्य कार्यकारिणीत निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सौ मंगलाताई गर्दे यांची महाराष्ट्र राज्य सचिव पदी निवड झाली आहे.
त्यांच्यासह इतर निवड झालेल्या पदाधिकारी पुढीलप्रमाणेडॉ अभिमन्यू वानखेडे – महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,सौ उषाताई वनारे – महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,सौ कावेरीताई जाधव – महाराष्ट्र राज्य सह सचिव या सर्व नियुक्त्या राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर शुक्ल, राष्ट्रीय सचिव बाळासाहेब पांडे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा डॉ विनोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आल्या. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सौ मंगलाताई गर्दे यांच्या या निवडीचे बुलढाणा जिल्ह्यातून आणि सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.