राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल वेल्फेअर फाउंडेशन महाराष्ट्र उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार गणेश आसोरे

मराठी न्यूज माझा
0

नांदुरा (बुलडाणा) :

पत्रकारितेच्या क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ अखंडितपणे कार्यरत राहून नांदुरा शहरासह विदर्भ-महाराष्ट्रात आपली ठळक ओळख निर्माण केलेल्या


ज्येष्ठ पत्रकार गणेश येसाजी आसोरे यांची राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र व ओळखपत्र अकोला येथे दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित भव्य कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्षा सौ. दीपमाला कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या वेळी सभागृह प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते.

१९८१ पासून अखंडित पत्रकारिता

गणेश असोरे यांनी 1981 साली पत्रकारितेत प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत सत्य व निष्पक्ष वार्तांकन करत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. स्थानिक तसेच प्रादेशिक प्रश्नांचा धांडोळा घेऊन समाजहिताचे विषय मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेणे हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. नांदुरा शहरात ‘सत्य, तटस्थ आणि सर्वप्रथम बातमी’ देणारे पत्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.

सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग

पत्रकारितेबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात गणेश असोरे यांनी सदैव पुढाकार घेतला आहे. गरजूंच्या मदतीसाठी, शैक्षणिक व सामाजिक चळवळींसाठी त्यांनी केलेल्या योगदानामुळे त्यांचे कार्यक्षेत्र पत्रकारितेपेक्षा कितीतरी पटीने व्यापक झाले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा संस्थेशी कधीही बांधीलकी न ठेवता केवळ समाजहितासाठी कार्य करण्याचा त्यांचा ध्यास कायम राहिला आहे.

डिजिटल माध्यमातून प्रचंड लोकप्रियता

आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत राहून त्यांनी मोबाईल पोर्टलद्वारे बातम्या पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला. त्यांच्या या पोर्टलवर दररोज ८ ते १० हजार वाचक २४ तासांत बातम्या वाचतात, ही त्यांच्या लोकप्रियतेची ठळक नोंद आहे. विदर्भापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रातही त्यांचे नाव लौकिकास पोहोचलेले आहे.

विशेष सत्कार मराठी न्यूज माझा कार्यालयात 

 श्री विनोद खंडारे, मुख्य संपादक मराठी न्यूज माझा यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार गणेश आसोरे  यांचा सत्कार 

गणेश आसोरे यांचे मराठी न्यूज माझा कार्यालयात आगमन झाल्यानंतर  मराठी न्यूज माझा वृत्तसंस्थेचे मुख्य संपादक श्री. विनोद खंडारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मराठी न्यूज माझा टीम या सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

अभिनंदनाचा वर्षाव

त्यांच्या नियुक्तीबद्दल शहरासह जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर व नागरिकांनी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. या नियुक्तीमुळे नांदुरा शहराचा सन्मान वाढल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

गजानन बोटूळे, (वाणिज्य प्रतिनिधी मराठी न्यूज माझा) यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार गणेश आसोरे  यांचा सत्कार

निरवडीत निर्भीड पत्रकार म्हणून नांदुरा बुलढाणा जिल्ह्यात त्यांची ओळख होती परंतु ज्येष्ठ पत्रकार मोबाईल पोर्टलवरून आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नाव आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो निर्भीड पत्रकार सत्य आणि सर्वप्रथम बातमी टाकणारे गणेश असोरे

राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी झालेली गणेश आसोरे यांची ही निवड केवळ त्यांच्या पत्रकारितेचा गौरव नसून, सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या एक निष्ठावंत व्यक्तीच्या कार्याची पावती असल्याचे मानले जात आहे.

(जाहिरात पुरस्कृत)


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)