नांदुरा ता. ३० जून
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून नांदुरा नगरपालिका कार्यालयात आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नांदुरा शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि स्वाभिमानी शिव संदेशचे मुख्य संपादक श्री सुरेशदादा पेटकर तसेच नगरपालिकेचे अधिकारी श्री तडवी साहेब श्री चोपडे साहेब भंडारपाल श्री कदम साहेब आणि कर विभागाचे कर्मचारी प्रल्हादजी नाफडे रोशनजी वाकोडे अजयजी लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे योग्य नियोजन नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष शिपाई श्री गजानन वानखेडे उर्फ कमांडो यांनी केले सर्वांच्या उपस्थितीत जयंती कार्यक्रम शांतता व आदरभावात पार पडला
हरित क्रांती घडवणाऱ्या या थोर नेत्याच्या स्मृतीला वंदन करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करून आधुनिक शेती आणि कृषी क्षेत्रातील विकासासाठी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा असे मत व्यक्त केले