मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय समता परिषदेच्या आढावा बैठकीत, महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा कॅबिनेट मंत्री आणि समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील संघटनात्मक घडामोडींवर सखोल चर्चा झाली. या बैठकीत संघटना अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने काही नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर सुभाष महादेवराव गवळी (नांदुरा) यांची समता परिषद उत्तर बुलडाणा (घाटाखालील विभाग) जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सुभाष गवळी यांच्या निवडीचे ओबीसी समाजातून जोरदार स्वागत होत असून, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
![]() |
जाहिरात |
बैठकीस मा. खासदार समीर भाऊ भुजबळ, मा. आमदार पंकज दादा भुजबळ, अनिल नळे, समता परिषदचे जिल्हाध्यक्ष संतोष खांदेभराड, कैलास सपकाळ, निवृत्ती इंगळे, पवन माळी, सुनील उमरकर, विनय उमरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
जाहिरात |