महर्षी पाणिनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

मराठी न्यूज माझा
0

नांदुरा (जि. बुलढाणा) : महर्षी पाणिनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदुरा येथे शैक्षणिक सत्र 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in/

https://admission.dvet.gov.in

या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा.

*उपलब्ध अभ्यासक्रम व जागा:*

* फिटर – 2 वर्षे – 20 जागा

* वेल्डर – 1 वर्ष – 20 जागा

* टर्नर– 2 वर्षे – 20 जागा

* पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – 1 वर्ष – 20 जागा

* ड्रेस मेकिंग (शिवणकाम) – 1 वर्ष – 24 जागा

* कॉस्मोटोलॉजी (ब्युटी पार्लर)– 1 वर्ष – 20 जागा

एकूण जागा: 144

प्रवेश पात्रता:

उमेदवारांनी किमान 8वी, 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (कोर्सनुसार पात्रता वेगळी असू शकते).

 उमेदवाराचे वय किमान 14 वर्षे असावे.

प्रवेश प्रक्रिया:

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 29 मे 2025

प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होण्याची तारीख: जुलै 2025

अंतिम गुणवत्ता यादी व प्रवेश फेरी: जुलै-ऑगस्ट 2025

मार्गदर्शन सत्र:

संस्थेत दररोज प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी या सत्रांचा लाभ घ्यावा.

प्राचार्यांचे आवाहन:

संस्थेचे प्राचार्य श्री. जी. एन. काळे यांनी सर्व पात्र उमेदवारांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन अर्ज करून प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी संकेतस्थळ: https://admission.dvet.gov.in,


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)