शेगाव – रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार भुसावळ मंडळात २२ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत ‘विश्व पर्यावरण दिन’ साजरा केला जात असून, त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २५ मे रोजी शेगाव रेल्वे स्थानकावर पर्यावरण जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीद्वारे पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम, वृक्षारोपणाची आवश्यकता तसेच सिंगल यूज प्लास्टिकच्या टाळणीबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. रॅलीदरम्यान स्थानक परिसरात असलेल्या प्रवाशांनी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला.
या अभियानात श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवत जनजागृती मोहीमेस अधिक बळकटी दिली. त्यांच्या सहभागामुळे उपक्रमाला सामाजिक स्वरूप मिळाले आणि अधिक व्यापक जनसंपर्क साधता आला.
या रॅलीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयीची जाणीव वाढीस लागली असून, हा उपक्रम एक प्रभावी जनजागृतीचं उदाहरण ठरला आहे.