आ. चैनसुख संचेती यांची भाजपाच्या प्रदेश निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती

मराठी न्यूज माझा
0

मलकापूर:

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र प्रदेश संघटनात्मक मंडळाच्या रचनेसाठी आ. चैनसुख संचेती यांची प्रदेश निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांना महाराष्ट्र प्रदेश संघटनात्मक मंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री ना. चंद्रकांत बावनकुळे यांनी संचेती यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे. पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी आणि आगामी निवडणुकांची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

आ. संचेती हे अनुभवी नेते असून, त्यांनी पक्षसंघटनेसाठी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील भाजप संघटना अधिक मजबूत आणि प्रभावी होईल, असा पक्षश्रेष्ठींचा विश्वास आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)