वैभव धंदरे यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार

मराठी न्यूज माझा
0


मुंबई, (विशेष प्रतिनिधी) बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील  येथील वैभव धंदरे यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर बालाजी फिल्म इंडस्ट्रीज येथे दोन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला.

वैभव धंदरे याने आर्ट डायरेक्शन केलेली फिल्म 'HAPPY BIRTHDAY ZEE NU" ला सलग पाचवा अवॉर्ड कोटा राजस्थान, कॅलिफोर्निया अमेरिका, येथे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मधे विशेष पुरस्कार प्राप्त झाले नंतर. आता आपले माय भुमित छत्रपति संभाजी नगर येथे काल पाचवा अवॉर्ड मिळाला आहे. त्याचे सर्व स्थरावर कौतुक होत आहे.

 त्यांनी अनेक चित्रपटांत आर्ट डायरेक्शनचे काम केले असून, ‘HAPPY BIRTHDAY ZEE NU’ या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे.  

चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना विशेष उल्लेख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजस्थानातील कोटा येथे झालेल्या या महोत्सवात ९३ देशांतील ११०४ चित्रपटांनी सहभाग घेतला होता.


त्यांनी ‘A Tail of an Onion’ या टेलीफिल्मचे आर्ट डायरेक्शन उत्तम प्रकारे हाताळले असून, या टेलीफिल्मला यूट्यूबवर ५.८ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.  

वैभव धंदरे यांचे वडील महादेव धंदरे हे महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून, ते कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांच्या या यशाबद्दल वैभव धंदरे आणि त्यांचे कुटुंबीय यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.मराठी न्यूज माझा तर्फे वैभव धंदरे यांचे यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)