नांदुरा
स्वामी विवेकानंद जयंती निमित्त दि. १२ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. ऍड मंगल प्रभात लोढा,मंत्री कौशल्य,रोजगार, उद्योगकता व नाविन्यता, महाराष्ट्र राज्य , यांच्या कल्पक संकल्पनेतून आटीआय मधील प्रशिक्षणार्थ्यांना विविध कलागुणांना, कौशल्यांना वाव मिळावा व प्रोत्साहन मिळावे म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदुरा येथे रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी, संस्थेत सकाळी ११.०० वाजता राष्ट्रीय युवा दिन निमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे, या निमित्ताने, मलकापूर विधानसभा सदस्य मा. आमदार. श्री. चैनसुख संचेती यांना कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले असुन व श्री.विलास पाटील पोलीस निरिक्षक नांदुरा, श्री. प्रकाश केडीया अध्यक्ष संस्था व्यवस्थापन समिती,श्री. शंकर शर्मा सदस्य संस्था व्यवस्थापन समिती, श्री. विश्वास मापारी मुख्याध्यापक जंगली महाराज विद्यालय,नांदुरा यांना राष्ट्रीय युवा दिन निमित्त निमंत्रीत करण्यात आले आहे, संस्थेतुन यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल प्रशिक्षणार्थी तथा नावरुपास आलेले यशस्वी उद्योजक यांना निमंत्रित करुन त्यांचे उद्योजकता विषयक तथा व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन सत्र घेण्यात येणार आहे, सोबत संस्थेमध्ये वर्षभरात केलेल्या वेशिष्ट्रयपूर्ण कार्य केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना गौरवांकित करण्यात येणार आहे, स्वामी विवेकानंद व आजचा युवक या विषयावर उद्बोधन करणार आहेत, सदर कार्यक्रमाकरिता युवकांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन सदर सत्राचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.