अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्नित नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी बैठक संपन्न!
मराठी पत्रकार परिषदेशी सलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नांदुरा तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत करण्याकरिता दिनांक १० जानेवारीला एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.ह्यावेळी तालुका अध्यक्षपदी संतोष तायडे तर शांताराम बेलोकार यांची सचिव पदी एक मताने अविरोध निवड करण्यात आली. ह्यावेळी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य म्हणून माजी तालुकाध्यक्ष तुकाराम रोकडे, सुरेश पेठकर व वीरेंद्र सिंग राजपूत यांची जिल्हा सदस्य म्हणून निवड करण्यातआली. यावेळी बुलढाणा जिल्हा नूतन कार्यकारणीचे जिल्हा अध्यक्ष रंजीत सिंह राजपूत, अनिल उंबरकर डिजिटल -ग्रुपचे राज्य उपाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख,वशीम शेख, जिल्हा सहसचिव शिवाजी मामनकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
![]() |
पत्रकार भगवान बावणे चर्चा करतांना |
यावेळी जेष्ठ पत्रकार गणेश आसोरे, विनोद खंडारे,भाऊसाहेब बावणे, भगवान बावणे, अरुण सुरवाडे, दिलीप इंगळे ,सिद्धार्थ तायडे, देविदास मानकर, गजानन बोटुडे, अमीन खान भाई, भागवत दाभाडे ,देवेंद्र जयस्वाल, रतन डोंगरदिवे, योगेश धोटे ,तसेच जिल्हा पत्रकार महिला संघामध्ये समावेश करण्यात आलेल्या , मंगलाताई गर्दे व,उमाताई बोचरे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.