नांदुरा, ( ऑनलाइन न्यूज डेस्क )नांदुरा शहराच्या इतिहासात प्रथमच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी मध्ये दोन महिला पत्रकारांसह सहा पत्रकारांचा समावेश पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आणि उत्साह निर्माण झाला आहे आपल्या पाठीशी जिल्हा पत्रकार संघ असल्याने आणखीन जिद्दीने काम करण्याचा उत्साह येथील पत्रकारात निर्माण झाला आहे कारण नांदुरा तालुक्यातील पत्रकारांना गॉड फादरच कोणी मिळाला नसल्यामुळे त्यांच्या अनेक समस्यांचे निराकरणही होत नसल्यामुळे आता त्यांना मोठ्या आशा निर्माण झालेल्या आहेत हे विशेष.
याबाबतचे वृत्त असे की बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारणी मधील जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह राजपूत,अनिल उंबरकर डिजिटल -ग्रुपचे राज्य उपाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख,वशीम शेख, जिल्हा सहसचिव शिवाजी मामनकर यांच्या उपस्थितीमध्ये नांदुरा तालुका पत्रकार संघ अध्यक्ष निवडीसाठी बैठक संपन्न झाली. यावेळी सविस्तर चर्चा केल्यानंतर स्वतः जिल्हाध्यक्षांनी सर्वानुमते अध्यक्ष संतोष तायडे व शांताराम बेलोकार सचिव यांच्या नावाची घोषणा केली. तर भाऊसाहेब बावणे यांनी अनुमोदन दिले तदनंतर कार्यकारणी घोषित करण्यात आली.
याप्रसंगी नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार शहरातील दोन महिला निर्भीड लिखाण करणाऱ्या उमाताई बोचरे आणि मंगलाताई गर्दे या पत्रकारांचा समावेश नव्याने करण्यात आला. त्यांना जिल्हा अध्यक्षाने सर्वानुमते,महिला जिल्हा कार्यकारणी मध्ये समावेश करून नांदुरा शहरातील व तालुक्यातील पत्रकारांना प्रथमच आश्चर्याचा धक्का दिला कारण नांदुरा तालुका पत्रकार संघामध्ये प्रथमत दोन महिलांना सामावून घेण्यात आले.

एक निर्भीड पत्रकार म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जात आहे. जिल्हा महिला पत्रकार संघामध्ये समावेश केल्याने एक नवा उत्साह संचारला आनंदामध्ये आणखी भार पाडत जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी मध्ये नांदुरा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तुकारामजी रोकडे, व आंदोलन सम्राट व जनसामान्यांच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांना भंडावून सोडणारे सुरेशदादा पेठकर यांचा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी मध्ये समावेश झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. करण्यात आल्यामुळे पुन्हा एक आनंदाची बातमी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने नांदुरा येथील पत्रकारांना दिली डिजिटल मीडिया पत्रकारितेमध्ये माताब्बर असणारे विनोद भाऊ खंडारे व अमीन खान यांची नियुक्ती केली आहे. यामुळे प्रथमच नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या आठ पत्रकारांना जिल्हा कार्यकारणी मध्ये समावेश केल्याने मागील 45 वर्षांमध्ये प्रथमच जिल्हा कार्यकारिणीवर आठ जणांची नियुक्ती झाल्यामुळे नांदुरा तालुका पत्रकार संघात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकारी पत्रकार बांधवांना अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव केल्या जात आहे. तर नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार गणेश असोरे माजी तालुका अध्यक्ष तुकाराम रोकडे , व सुरेशदादा पेटकर यांनी नवनियुक्त अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ व बुके देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार श्री गणेश आसुरे यांनी केले तर. कार्यक्रमाचे प्रस्तावना सुरेश दादा पेठकर यांनी केली. या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार गणेश आसोरे,भाऊसाहेब बावणे, सुरेश दादा पेठकर, विनोद खंडारे, भगवान बावणे, शांताराम बेलोकार, अमीन खान,अरुण सुरवाडे, दिलीप इंगळे , गजानन बटुळे, योगेश धोटे,सिद्धार्थ तायडे, देविदास मानकर, भागवत दाभाडे ,देवेंद्र जयस्वाल ,उमाताई बोचरे, मंगलाताई गर्दे यांच्यासह शहरातील व तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते.
