![]() |
श्री.भगवान बावणे |
मुंबईः
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,दैनिक साक्षीवंदना मुख्य संपादक भगवान बावणे यांना मराठी न्युज माझा चॅनेल च्या वतीने "व्हिजन माझा" हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दैनिक साक्षीवंदना मुख्य संपादक भगवान बावणे यांनी पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या कार्याबद्दल त्यांना विजन माझा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील नामवंत मराठी न्यूज माझा या चॅनलच्या वतीने देण्यात येणारा "व्हिजन माझा" या पुरस्काराने भगवान भावाने सन्मानित होणार असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आनंदाची लाट उसळली आहे
त्यांच्या आजवरच्या पत्रकारिता ,व सामाजिक कार्याची विशेष सहभागाची दखल घेऊन मराठी न्युज माझा चॅनेलच्या वतीने महाराष्ट्रातून नामवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार असून, बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील पत्रकारीता व सामाजिक कार्याचा प्रदिर्घ अनुभव असलेले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,दैनिक साक्षीवंदना मुख्य संपादक भगवान बावणे यांना "व्हिजन माझा"हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पत्रकारिता व सामाजिक कार्याचा प्रदिर्घ अनुभव असलेल्या तसेच आजही जनमाणसात एक निष्ठावान, प्रामाणिक, कणखर, निर्भीड आणि हरहुन्नरी सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व असलेले पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दैनिक साक्षीवंदना मुख्य संपादक भगवान बावणे यांच्या सामाजिक कार्याला सलाम केल्याशिवाय राहवत नाही
पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, दैनिक साक्षीवंदना मुख्य संपादक भगवान बावणे यांना "व्हिजन माझा" पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.