विनोद खंडारे, ऑनलाईन न्यूज डेस्क
नांदुरा शहरातील शासकिय विश्राम गृह वर आज भ्रष्टाचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य चे जिल्हा अध्यक्ष डॉ. ए. आर. वानखडे साहेब यांचे अध्यक्ष ते खाली व संतोष जी नायसे. प्रदेश उपाध्यक्ष व लक्ष्मण दादा राठोड. विदर्भ प्रदेश सचिव. व सत्तार भिकान केदार. विदर्भ प्रदेश संपर्क प्रमुख व निवृत्ती भाऊ वाघ पाटील जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा यांचे प्रमुख उपस्थितीत नांदुरा येथे मोठ्या उत्साहात बैठक घेण्यात आली.
यावेळी नांदुरा शहरातील सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्का साठी नेहमीच अग्रेसर असणारे ज्येष्ठ पत्रकार व मुख्य संपादक स्वाभिमानी शिवसंदेश चे मुख्य संपादक सुरेशदादा पेठकर पाटील यांची जिल्हा संपर्क प्रमुख बुलढाणा या पदावर नियुक्ती करण्यात आली त्या वेळी जिल्हा अध्यक्ष श्री वणखडे यांनी भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे कामा बाबत सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती दिली.
माजी नांदुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व नवनिर्वाचित जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तुकाराम जी रोकडे यांचा सत्कार डॉ. वानखडे साहेब याचे हातून सत्कार करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणावर नांदुरा शहरातील कार्यकर्ते हजर होते