सौ.ठाकरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विवेकानंद वाचनालयाला भेट
नांदुरा दि.१७ जानेवारी
शाळेत शिक्षक शिकवत असतांना विद्यार्थ्यांनी लक्षपुर्वक ऐकुन मनन, चिंतन केल्यास परीक्षेच्या वेळी चिंता करण्याची गरज राहणार नाही.शालेय पुस्तकां सोबत वाचनालयातील पुस्तकांचे वाचन केल्याने आपल्या ज्ञानात भर पडते.असे उदगार विवेकानंद सार्वजनिक वाचनालय नांदुरा चे सचिव ग्रंथमित्र गजानन डोंगरकार यांनी काढले.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवाड्या निमित्त दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी सौ मायाताई ठाकरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदुरा च्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय नांदुरा ला भेट दिली.विद्यार्थ्यांनी वाचनालयातील पुस्तकाचे वाचन केले.
या प्रसंगी सौ शूद्धमती ताई डोंगरकार बोलतांना सांगीतले की ध्यान केल्याने आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते,स्मरणशक्ती वाढते . म्हणुन विद्यार्थ्यांनी दररोज किमान आपल्या वयाएवधी मिनिट ध्यान करावे.त्यांनी विद्यार्थ्यांना ध्यानाचे महत्व सांगुन ध्यान कसे करावे सांगितले तसेच विद्यार्थ्याचे ध्यान घेतले.
ग्रंथपाल सौ वृषाली आडोळकर यांनी विद्यार्थ्यांना वाचानालयाची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय श्री प्रवीण गिरी सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री नितीन चिंचपुरे सर यांनी केले.कार्यक्रमाला वर्षा नेमाडे,वैभव आखरे सर सुनीता भातुरकर ताई उपस्थित होत्या.