![]() |
नांदुरा तहसीलदार अजितराव जंगम |
नांदुरा ( जिल्हा बुलढाणा )
नांदुरा तहसीलदार म्हणून नव्याने आलेले बुलढाणा येथे अस्थापना विभागात कार्यरत असलेले. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील शेतकरी कुटुंबातील वडील महाराष्ट्र शासन सेवेत ग्रामसेवक पदावरून सेवानिवृत्त झाले. कडेगाव येथील शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिक मिळविण्यास सुरुवात केली आणि पहिल्याच झटक्यात एमपीएससी परीक्षेत यशस्वीरित्या पास झाल्यावर त्यांची निवड प्रथमच बुलढाणा येथे अस्थापना विभागात महाराष्ट्र शासनाने केली त्यानंतर त्यांना नांदुरा येथे तहसीलदार श्री मुकुंदे साहेब येथे सेवानिवृत्त झाल्यामुळे नांदुरा तहसीलदाराची जागा रिकामी होती त्या ठिकाणी श्री अजितराव जंगम यांची प्रथम तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जुलै 2025 मध्ये प्रभारी म्हणून नायब तहसीलदार श्री वट्टे साहेब यांनी कार्यभार सांभाळला होता.दिनांक 30 जुलै 2025रोजी अजितराव जंगम यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारून आपल्या कार्याला सुरुवात केली नांदुरा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
नांदुरा येथे बदलून आलेले तहसीलदार अजितराव जंगम यांचे स्वागत नांदुरा महसूल संघटनेच्या वतीने अध्यक्ष स्वप्निल ज.चव्हाण, उपाध्यक्ष राजू पारस्कर, सचिव संजय पारखेडकर व इतर कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.