शिक्षकासोबत अकश्लिल व्हिडीओ बनवून, त्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून 12 लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्यां चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे
नंदुरबार येथील शिक्षक फिर्यादी यांची एक महिन्यापुर्वी धुळे येथील जी.टी.पी. स्टॉप जवळील एका मुलीशी फेसबुक मेसेंजरचे माध्यमातुन फ्रेनड रिक्वेस्ट स्विकारुन चॅटींग सुरु झाली. ते दोघे एकमेकांना मेसेजद्वारे संपर्कात आले. त्यात दि.1जानेवारी रोजी त्या मुलीने फिर्यादी यांना धुळे येथे भेटण्यास बोलविले. दि.12 जानेवारी रोजी फिर्यादी जी.टी.पी. स्टॉपजवळ आले. तेथे संबंधित मुलगी तिच्या दूचाकीने फिर्यादी यांना घेण्यास आली.
जी.टी.पी. कॉलनी कडुन ती मुलगी फिर्यादीस तिच्या घरी घेवुन गेली.तिच्या घरी गेल्यानंतर ही मुलगी निर्वस्त्र झाली. थोडयाच वेळात घरात तीन व्यक्ती आले. त्यांनी फिर्यादीचे कपडे काढुन महिलेसोबत व्हिडीओ तयार केला. नंतर त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. 12 लाख रुपये खंडणीची मागणी केली. खंडणी दिली नाही, तर हा व्हिडीओ व्हायरल करु ,असे सांगुन फिर्यादीचा मोबाईल हिसकावुन घेतला. नंतर सायंकाळी फिर्यादी नंदुरबार येथे निघुन गेले.
दि. 13 जानेवारी रोजी फिर्यादी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या समोर घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करुन, नंदुरबार येथे धुळे चौफुलीवर पोलीसांच्या पथकासह सापळा रचला.नंदुरबार येथे धुळे चौफुलीवर पथकाने 4 जणांना खंडणी स्विकारताना रंगेहात पकडले. यात आरोपी मुलगी, तसेच धुळे येथे राहणारे देवेश दिपक कपुर, हितेश ज्ञानेश्वर बिहाडे, हर्षल गोपाल वाघ, विनय देवानंद नेरकर यांचा समावेश आहे.