नांदुरा (प्रतिनिधी) –
नांदुरा शहरात ट्रॅफिक पोलिस कर्मचारी अनिल रामदास गोराणे (राणा) यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला मोबाईल योग्य मालकाकडे सुखरूप पोहोचला आहे.
घटनेची माहिती अशी की, ट्रॅफिक पोलिस कर्मचारी अनिल रामदास गोराणे (राणा) यांना शहर परिसरात ड्युटीवर असताना एक मोबाईल फोन सापडला. सदर मोबाईल लॉक असल्यामुळे त्यातील माहिती थेट पाहता आली नाही. तरीही पोलीस कर्मचारी गोराणे (राणा) यांनी त्यांना हरवलेला मोबाईल योग्य मालकापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्परतेने प्रयत्न सुरू केले.
गोराणे यांनी मोबाईलमधील सिम कार्ड काढून आपल्या मोबाईलमध्ये टाकले. त्यातून त्यांनी मोबाईल मालकाचा नंबर मिळवून सुभाष वेरुळकर, रा. नांदुरा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मोबाईल प्रत्यक्षात त्यांना परत देण्यात आला.
कर्तव्यदक्ष राणाजींचे व्यक्तिमत्व
👉 नेहमी ड्युटीवर असताना कर्तव्यदक्षपणे काम करणारे
👉 दबंग व्यक्तिमत्व असलेले, परंतु नागरिकांशी नम्रतेने वागणारे
👉 नांदुरा शहरातील वाहतूक शिस्तीचे काटेकोर पालन करणारे
👉 नागरिकांच्या अडचणींना तत्परतेने प्रतिसाद देणारे
या घटनेमुळे गोराणे यांच्या प्रामाणिकपणाचे आणि नागरिकांबद्दलच्या जबाबदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक नागरिकांनीही "पोलिसांनी दाखवलेला हा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी आहे," अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.