छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत नांदुरा मंडळात महसूल सेवा थेट जनतेपर्यंत

मराठी न्यूज माझा
0


नांदुरा, जिल्हा बुलढाणा,महसूल सप्ताहाच्या निमित्ताने नांदूर येथील तलाठी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या उपक्रमात नवीन तहसीलदार श्री अजीतराव जंगम यांनी स्वतः भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व विविध प्रकारचे दाखले लाभार्थ्यांना वाटप केले. या कार्यक्रमात उत्पन्न प्रमाणपत्र, सातबारा, कुटुंब अर्थसहाय्य योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना तसेच घरकुलासाठी शासकीय जमिनीचे पट्टे यांचा लाभ देण्यात आला.
या अभियानाच्या माध्यमातून नांदुरा तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. 

कार्यक्रमास मंडळ अधिकारी श्री. प्रमोद उगले साहेब, ग्राम महसूल अधिकारी कैलास घोपे साहेब, धाडसे साहेब, खुराळे साहेब,  चतुर मॅडम, जोशी मॅडम, महसूल सेवक श्री प्रभाकर भिसे, राम ताकवाले, विनोद भिडे, चंदन गोळे मॅडम, फरान खान व अन्य महसूल कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महसूल सेवा अधिक कार्यक्षमतेने व पारदर्शकपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमातून सफल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)