नांदुऱ्याचा महाराजा प्रताप गणेशोत्सव मंडळाचे पारंपारिक पद्धतीने आगमन

मराठी न्यूज माझा
0

 

गजानन मुरकर (नांदुरा)

      नांदुऱ्यातील महाराजा प्रताप गणेशोत्सव मंडळा तर्फे गणरायाचे आगमन पारंपारिक ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात आले. गणेशभक्तांच्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.

महाराजांच्या आगमनानंतर शहरातील अनेक ठिकाणी आरत्या व पूजाअर्चा पार पडल्या. आकर्षक चांदीच्या दागिन्यांनी सजविलेल्या देखण्या गणेशमूर्तीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. मंडळाच्या या उपक्रमातून समाजाला आदर्श घेण्यासारखा संदेश देण्यात आला आहे.

उत्सव काळात दररोज संध्याकाळी ७ वाजता अथर्वशीर्ष पठण व आरतीचे आयोजन करण्यात आले असून सर्व गणेश भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

या आगमन सोहळ्यास सचिन राणे, दत्ता बेंदरकर, भागवत राऊत, उमेश वाघोळे, विठ्ठल पालकर, गजानन राखोंडे, सुनील राखोंडे, शुभम नावकार, गजानन पंढरकर, अनिल राखोंडे, जनार्दन पवार, शाश्वत उंबरकर, गजानन मुरकर, समीर चोपडे, प्रवीण रंगदळे तसेच बाल सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महावितरण विभागाने सहकार्य केले.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)