घाटपुरी (बुलडाणा) – महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री शिवशंभू महादेव मंदिरात भव्य शिवलिंग व नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. श्री शिवशंभुव पवनपुत्र ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात धार्मिक विधींसह विविध कार्यक्रम पार पडले.
प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे धार्मिक विधी भव्य स्वरूपात संपन्न झाला. यावेळी प्राणप्रतिष्ठा महोत्सवाची सुरुवात माघ कृ. द्वादशी, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री गणेश पूजन व नगर प्रदक्षिणेने झाली. त्यानंतर सायंकाळी अग्निस्थापन, जलाधिवास, पुष्पाधिवास व शय्याधिवास विधी पार पडले.
दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी, महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासून पूजनास प्रारंभ झाला. सकाळी हवन, मूर्ती न्यास, प्रतिष्ठापना, अभिषेक आणि पूर्णाहुती विधी पार पडले. दुपारी श्रीनाथजी विहार, पवनपुत्र नगरी क्र. ०९, नवनाथ मंदिरामागे, घाटपुरी, ता. खामगाव येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात श्री नितीनभाऊ पनस्कर, श्री बसवेश्वर पनस्कर, श्री पवन शर्मा (शेगाव) यांच्यासह श्री शिवशंभु व पवनपुत्र ट्रस्ट, घाटपुरी चे अध्यक्ष ॲड. अमोल वसंतराव इंगळे यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकारिणी मंडळाचे पदाधिकारी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात ॲड. अमोल वसंतराव इंगळे (अध्यक्ष), श्री साहेबराव एकनाथ पाटील (उपाध्यक्ष), श्री विशाल प्रकाश जुमडे (सचिव), श्री किशोर विठ्ठल किन्हाके (सहसचिव), श्री मंगेश रामकृष्ण बानाईत (कोषाध्यक्ष), श्री जगदीश प्रभाकर शहाणे (विश्वस्त), श्री दीपक ज्ञानेश्वर पिंगळे (विश्वस्त), श्री हर्षल प्रकाश जुमडे (विश्वस्त), श्री राजू गजानन भालेराव (विश्वस्त), श्री उमेश अंकुश बेलोकार (विश्वस्त), श्री आनंद मनोहर ढवळे (विश्वस्त), समीर किनाके, महिला मंडळ व समस्त पवनपुत्र नगरी ०९ परिवार यांचा सक्रिय सहभाग होता.
या भव्य प्राणप्रतिष्ठा महोत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.