जागृती आश्रम शेलोडीचे श्री शंकरजी महाराज यांचा अमृत महोत्सवी वर्ष सोहळा, काल दि. 12 जानेवारी रोजी, जागृती आश्रमात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला . सोहळ्याच्या निमित्ताने, गेल्या 05 दिवसापासून सुरू असलेल्या ,श्री शतचंडी यागाची पूर्णाहुती , आरती करण्यात आली. श्री. शतचंडी याग गौरव समितीच्या वतीने ,डॉ. ज्ञानेश्वर मिरगे यांनी शब्दांकित केलेले ,परमार्थमय चरित्र चंदन ..सन्मानपत्र महाराजांना प्रदान करण्यात आले. उपस्थितांनी भावपूर्ण सत्कार केल्यानंतर,लाडू तुला करण्यात आली . साप्ताहिक सह्याद्रीने काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन होऊन, श्रींच्या आध्यात्मिक कर्तुत्वावर, श्री मोहनराव कुळकर्णी, संत साहित्य अभ्यासक .प्रा.डॉ राजेश मिरगे अमरावती, श्री. महादेवराव भोजने, डॉ.ज्ञानेश्वर मिरगे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.सौ. पौर्णिमाताई पिसे, आभार प्रदर्शन, श्री शतचंडी याग आयोजक श्री पांडुरंगजी धंदर यांनी केले. याप्रसंगी विदर्भातील असंख्य भाविकांची उपस्थिती होती. जागृती परिवाराने कार्य यशस्वीतेसाठी खूप कष्ट घेतले.
Post a Comment
0Comments