आनंदगंगा फाउंडेशन च्या वतीने पुरस्कार वितरण
![]() |
मंगला ताई गर्दे |
कोल्हापूर
ज्ञानगंगा फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने जिल्हा महिला संघटक मंगला सुभाष गर्दे यांना राज्यस्तरीय नारीशक्ती अवॉर्ड २०२४ पुरस्काराने सन्मानित कारण्यात आले.
।। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ॥
या उक्ती प्रमाणे तुम्ही सामाजिक कार्यक्षेत्रात अप्रतिम अशी कामगिरी केली आहे. तुम्ही केलेल्या या कार्यामुळे आपला तसेच आपल्या कुटुंबाचा उद्धार झाला आहे. आपण अनेक संकटांचा सामना करत प्रसंगी वेगळे व धाडसी निर्णय घेवून आपले निर्णय सिद्ध करून दाखवले आहेत.
यश काय असतं व ते कस मिळवायचं असतं हे आपणाकडे पाहून कळतं. आणि यश मिळवण्या बरोबरच ते टिकवणं हे ही महत्वाच असतं. दुर्गेच्या नऊ रूपाला साजेसं अस आपल यश आहे. आपल हे कार्य संपूर्ण नारी जातीस प्रेरणादायी आहे.
मंगला ताई यांनी केलेल्या सामाजिक कार्याला सलाम म्हणूनच आनंदगंगा फौंडेशन च्या वतीने त्यांना "राज्यस्तरीय नारीशक्ती अवॉर्ड २०२४" हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्रातील असंख्य नारिशक्ती महिला कोल्हापूर येथे उपस्थिती होत्या.या कार्यक्रमाला आनंदगंगा फाउंडेशन कोल्हापूर मधील समस्त पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.