देवानंद उमाळे, शेगांव
मस्साजोग, जि. बिडचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवुन सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी समस्त मराठा देशमुख समाज बांधव शेगांव कडून महामहीम राज्यपाल,राजभवन, मुंबई यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
दि.१७ जानेवारी २०२५ रोजी वि. तहसिलदार साहेब, शेगांव, मार्फत मामहिम राज्यपाल यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की मस्साजोग, जि. बिड या गावचे मागील १५ वर्षापासून सरपंच असलेले संतोष देशमुख यांची दि.०६/१२/२०२४ रोजी निर्घुण हत्या झाली आहे व हा अतिशय निंदणीय व मानुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. सदर हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे तसेच या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व गुन्हेगांराना फाशीची शिक्षा होवून या हत्येच्या कटात सामिल असलेल्या सर्वांची चौकशी व्हावी व संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आम्ही समस्त मराठा देशमुख समाज बांधव हे संतोष देशमुख यांच्या कुटूंबीयांच्या दुःखात सहभागी असुन कायम त्यांच्या कुटूंबीयांसोबत राहु असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर मोर्चा स्व.केशरबाई देशमुख मंगल कार्यालय येथून सर्व समाज बांधवांनी काळ्या फिति लाऊन निषेध नोंदवत तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांच्याकडे निवेदन सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी विजय भाऊराव देशमुख , अमित रमेशराव देशमुख, किरण देशमुख,युवराज देशमुख, रविंद्र पंजाबराव देशमुख,रजेश नारायणराव देशमुख , मुकुंद देशमुख, दिनेश देशमुख, संजय विजयराव देशमुख, अंकुश देशमुख, गणेश देशमुख, सुभाष देशमुख, अजय देशमुख, शक्ती बापू देशमुख, निकुंज देशमुख, उमेश देशमुख, प्रशांत देशमुख, साहिल देशमुख, लखन देशमुख, सचिन देशमुख, श्याम देशमुख सुधीर देशमुख, नाजुकराव देशमुख, नागेश देशमुख, कैलास देशमुख, नागोराव देशमुख, यांच्या सह समस्त मराठा देशमुख समाजातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.