विनोद खंडारे, नांदुरा
स्थानिक नांदुरा येथे आज दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत शासकीय औ.प्र. संस्था नांदुरा येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून उद्योजकता प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. तसेच राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमास उपस्थित प्रसिद्ध साहित्यिक मा. श्री गायकी साहेब यांनी प्रशिक्षणार्थ्यांना जीवनामध्ये विचारांना संस्कार व नीतिमूल्ये व परिश्रम यांची जोड दिल्यास जीवन यशस्वी होते असे सांगून जीवनाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन केले. तसेच यशस्वी उद्योजक व संस्था व्यवस्थापन समिती सदस्य मा.श्री शंकर शर्मा यांनी उद्योजकता व त्याच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच श्री विलास धोरण सर पर्यवेक्षक यांनी स्वामी विवेकानंद व आजचा युवक या संबंधी सुंदर असे व्याख्यान दिले संस्थेचे प्राचार्य श्री जी एन काळे यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक क्षेत्र सामाजिक व नैतिक मूल्यांबद्दल महत्व सांगितले. युवकांनी उद्योजकते कडे वळावे. शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रशिक्षणार्थ्यांना आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्याप्रमाणे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रेरणा दिली.