न.प.मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांचे हस्ते स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन
नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा नांदुरा येथे मोठ्या उत्साहात वार्षिक संमेलन आयोजित केले होते यावेळी नांदुरा नगर परिषद चे प्रशासक व मुख्य अधिकारी श्री मिलिंद जी दारोकार यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुधीरभाऊ मुऱ्हेकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये लाला भाऊ इंगळे, ह. भ. प. रामभाऊ झांबरे, सामजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेठकर, प्रशासन अधिकारी गजानन वानखडे सर,सामाजिक महिला कार्यकर्त्या किरण ताई बरालिया, निवाणे ताई, न. प. नांदुरा खुर्द मराठी शाळा मुख्याध्यापिका सावळे ताई, वाकोडे सर, रवींद्र तायडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी व नियोजन गजानन वानखेडे सर यांनी केली. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाला विध्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. नियोजनबद्ध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षीका सौ. धरमकर ताई व त्यांच्या सहकार्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षीका सौ.वेरुळकार ताई यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ धरमकर ताई यांनी केले.