सर्व सामान्य नागरिकांना अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास त्यांना वठणीवर आणू - सुरेशदादा पेठकर

मराठी न्यूज माझा
0

नांदुरा,

स्थानिक शासकीय कार्यालयात विविध कामासाठी ग्रामीण भाग व शहरी भागातील अनेक नागरिकांना विविध कामासाठी यावे लागत असते. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना काही अधिकारी व कर्मचारी हे त्यांची काम करण्यासाठी त्यांना लाचेची मागणी करतात अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी भ्रष्टाचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने सर्व सामान्य नागरिकांसाठी लढा उभारण्यात येईल असे आश्वासन नवनियुक्त भ्रष्टाचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य चे जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश दादा पेठकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. याप्रसंगी स्थानिक शासकीय विश्राम गृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत भ्रष्टाचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य चे जिल्हा अध्यक्ष श्री डॉ. ए. आर. वानखडे व श्री संतोष जी नायासे उप अध्यक्ष महा. राज्य यांचे सह लक्ष्मण दादा राठोड राज्य सचिव महा राष्ट्र. यांचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते 

नांदुरा शहरातील गेली चाळीस वर्षे पासून सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्का साठी नेहमीच लढा देणारे निर्भिड कणखर ज्येष्ठ पत्रकार मुख्य संपादक, आंदोलन सम्राट, स्वाभिमानी शिव संदेश चे मुख्य संपादक सुरेश दादा पेठकर (पाटील) यांची भ्रष्टाचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य चे जिल्हा संपर्क प्रमुख

पदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी  त्यांनी पत्रकार परिषद व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुरेश दादा म्हणाले की, शासकीय काम करता शासकीय करण्यात आलेल्या सर्वसामान्यांना काही भ्रष्ट अधिकारी ही लाचेची मागणी करतात,  अश्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांची माहिती घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ व त्यांना जेलचा रस्ता दाखवावा लागेल. लाच मागणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार आमचेकडे करा जेणेकरून सर्वसामान्यांना न्याय मिळेल असेही या प्रसंगी बोलताना सुरेश दादा पेठकर म्हणाले.

सांगितले यावेळ पत्रकार परिषदेला ज्येष्ठ पत्रकार गणेश भाऊ आसोर, ज्येष्ठ पत्रकार तुकाराम रोकडे, दिलीप जी कोल्हे, प्रशांत जी पाटील यांच्यासह  अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी नांदुरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते  नागेश भाऊ तांदळे व दत्ता भाऊ जुमडे, सोपान बडोकार, गजानन भाऊ बोटुडे, व सामाजिक कार्यकर्ता श्रीकृष्ण भाऊ चोपडे. पत्रकार मनीष जी वाणे याचे सह बाहेरगााहून आलेले  निवृत्ती भाऊ वाघ पाटील, गजानन भाऊ खवले, विष्णू भाऊ मानकर, सोळंके दादा वरवट बकाल, सत्तार भिकण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

(जाहिरात)

जाहिरात.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)