ध्यान महायज्ञात सहभागी व्हा, देवयानी नवगजे यांचे प्रतिपादन!

मराठी न्यूज माझा
0

प्रतिनिधी,

नांदुरा :महाराष्ट्र ध्यान महायज्ञ शेगांव येथे दिनांक २५ ते २८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार असून या ध्यान महयज्ञात सहभागी व्हा असे आवाहन या शिबिराच्या संयोजिका सिनियर पिरॅमिड मास्टर सौ देवयानी ताई देवेश नवगजे यांनी केले.शनिवार दिनांक २५जानेवारी रोजी दुपारी एक वाजता भावसार देवी मंदीर नांदुरा खुर्द येथे आयोजित ध्यान शिबिरात त्या मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.दुपारी ५ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात त्यांनी ध्यानाचे महत्व सांगुन प्रत्यक्ष ध्यान घेतले.

          कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ देवयानी ताई नवगजे,भावसार देवी मंदिराचे अध्यक्ष ज्ञानदेव काटले,सचिव विनोद परळकर व किशोर खैरे यांनी हिंगलाज मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.सौ हेमलता जुनगडे,सौ मेघा देशमुख,सौ नलिनी पाटील सौ शुद्धमती डोंगरकार यांनी देवयानी ताई यांना हिंगलाज मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला.सौ देवयानी ताई यांनी रांगोळीकार सूरज नरडे व घनःश्याम आंबेकर यांचा सत्कार केला.आपल्या भाषणात बोलतांना त्या पुढे म्हणाल्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दिनांक २५ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत शिवांश सेलिब्रेशन श्री गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज जवळ खामगाव रोड शेगांव येथे होणार आहे.या ध्यान महायज्ञात महाराष्ट्रासह संपुर्ण देशातून ३००० साधक सहभागी होतील.यात सीनिअर पिरॅमिड मास्टर परिणीता पत्री, अवनी राव,शंपा मुखर्जी,ब्रम्हर्षी प्रेमनाथ, ध्यानरत्न रामाराजु,यांच्यासह अनेक सीनिअर पिरॅमिड मास्टर मार्गदर्शन करणार आहेत.हे शिबीर निःशुल्क आहे.या शिबिरात मधुर संगितासह,पिरॅमिड वापरून सामुहिक ध्यान करण्यात येणार आहे.तसेच तज्ञांद्वारे आत्मज्ञान दिल्या जाईल.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ शुद्धमती डोंगरकार,परिचय डॉ.सौ बोरसे यांनी तर कार्यक्रमाचे संचलन गजानन डोंगरकार यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)